महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माळरानावर जनावरांना मिळतोय मुबलक हिरवागार चारा; शेतकरी आनंदी

शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणुन दुग्धउत्पादन व्यवसाय करत असतात. मात्र, या जनावरांना मागील काही दिवसांपासुन दुष्काळी संकटाचा सामना करावा लागला होता. पण, पावसाची कृपा झाल्याने सध्या माळरानावर जनावरांना पोटभरुन चारा मिळत असल्याने शेतकरी आनंदी आहेत.

By

Published : Aug 2, 2019, 9:27 AM IST

चारा

पुणे - दुष्काळी परिस्थितीमुळे मधल्या काळात जनावरांच्या चारा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. जनावरे अर्धपोटी रहात होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसाने डोंगर, माळराने हिरवीगार झाली आहेत. त्यामुळे जनावरे आता मोकळ्या माळरानावर मोठ्या आनंदात चरताना पाहायला मिळत आहे.

जनावरांना मुबलक हिरव चारा मिळत असल्याने शेतकरी आनंदी


उत्तर पुणे जिल्ह्यात शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणुन दुग्धउत्पादन व्यवसाय करत असतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात पाच ते सात जनावरे आहेत. मात्र, या जनावरांना मागील काही दिवसांपासुन दुष्काळी संकटाचा सामना करावा लागला होता. पण, पावसाची कृपा झाल्याने सध्या माळरानावर जनावरांना पोटभरुन चारा मिळत आहे.


शेतकरी या जनावरांवर आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच प्रेम करत असतो. जनावरांना चारा पाणी मिळाल्याशिवाय त्याला जेवन जात नाही. असे असताना आता या जनावरांना मुबलक चारा मिळत असल्याने शेतकरीही आनंदात दिसत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details