पुणे - जत्रा-यात्रा, लग्न, उन्हाळ्यात होणारे सार्वजनिक कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी मोठ्या भांडवली खर्चातून फुलशेती फुलवली. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे फुलशेती मातीमोल झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
लॉकडाऊनमुळे फुलशेती मातीमोल; शेतकरी आर्थिक संकटात
जत्रा-यात्रा, लग्न, उन्हाळ्यात होणारे सार्वजनिक कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी मोठ्या भांडवली खर्चातून फुलशेती फुलवली. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे फुलशेती मातीमोल झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील निलेश गव्हाणे या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतात पिवळ्या आणि लाल झेंडूची लागवड केली आहे. यासाठी सुमारे 1 लाख 30 हजार रुपयांचा खर्च आला. त्यांना या फुलांपासून तीन लाखांपर्यत उत्पन्न मिळण्याची आपेक्षा होती. मात्र, लॉकडाऊनच्या काळात फुलांना बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे फुले शेतातच सोडून द्यावी लागत आहे. त्यामुळे मोठा आर्थिक तोटा या शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाऊन कडक करत जत्रा-यात्रा, लग्न,सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. तसेच मंदिरेही बंद करण्यात आली. त्यामुळे फुलांची मागणी थांबली. लॉकडाऊनमुळे फुले शेतातचं सडत आहेत. पुढील काळात या शेतकऱ्यांचा तोटा कसा भरून निघणार, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. मायबाप सरकारने या कष्टकरी बळीराराच्या मागे खंबीरपणे उभे राहून मदतीचा हात द्यावा अशी मागणी केली जात आहे.