महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दौंड शहरातील पाच दुकाने ३० दिवस सील, नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई

दौंड शहरातील पाच दुकानांवर पोलीस ,तहसीलदार आणि दौंड नगरपरिषदेने संयुक्त कारवाई करत पुढील ३० दिवस दुकाने सीलबंदचा आदेश दिला आहे.

दौंड शहरातील पाच दुकाने ३० दिवस सील
दौंड शहरातील पाच दुकाने ३० दिवस सील

By

Published : May 7, 2021, 1:21 PM IST

दौंड- अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश नसताना देखील सुरू असलेल्या पाच दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील ३० दिवस व त्यानंतर तहसील कार्यालयाचा आदेश येईपर्यंत ही दुकाने सीलबंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सदर कारवाई दौंड पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय तसेच दौंड नगरपरिषद यांनी मिळून केली असल्याची माहिती पोलीस उप-अधीक्षक मयूर भुजबळ यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेत नसतानाही दुकाने सुरू -

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने काही निर्देश व नियमांचे जारी केले आहेत. त्यानुसार स्वत:ला तसेच इतरांना आजाराची लागण होऊ नये म्हणून शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक केलेले आहे. मात्र, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील काही दुकानेही अत्यावश्यक सेवेमध्ये येत नसतान देखील चालु असल्याचे आढळून आले.

पाच दुकानांवर कारवाई -

याबाबत दौंड पोलीस स्टेशनचे प्रोबेशनरी पोलीस उप-अधीक्षक मयुर भुजबळ व तहसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड शहरातील
१)मे. शिव संगम कलेक्शन
२)मे मॅगी कलेक्शन
३) मे.जय मॉ कलेकशन
४) मे. अरिहंत क्लॉथ स्टोअर्स
५) मे. धी दौंड क्लॉथ
या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे .

पुढील ३० दिवस दुकाने सीलबंद -

वरील पाच दुकानांवर दिनांक ६ मे २०२१ रोजी ते पुढील ३० दिवस आणि त्यानंतर तहसील कार्यालयाचा आदेश येईपर्यंत सीलबंद आदेश जारी करण्यात आले आहेत. अशी माहिती दौंड पोलीस स्टेशनचे प्रोबेशनरी पोलीस उप-अधीक्षक मयुर भुजबळ यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details