पुण्यातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील आगीवर नियंत्रण; जीवितहानी नाही
ग्णालयाच्या वरच्या मजल्यावर आग लागल्यामुळे सुरुवातीला अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळ्यांचा सामना करावा लागला. परंतु, अथक प्रयत्नानंतर त्यांनी अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या जवानाकडून सांगण्यात आले.
पुण्यातील गोळीबार मैदानाजवळील कॅंटोनमेंट रुग्णालयात आग
पुणे - पुण्यातील कॅटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील 'ऑपरेशन थिएटर'मध्ये आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेl अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे.
Last Updated : Sep 5, 2020, 2:16 PM IST