महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शनिवार पेठेतील इमारतीला आग, नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

शनिवार पेठेतील प्रभात टॉकीज समोरील गल्लीतील एका इमारतीला आग लागली आहे. इमारतीत अडकलेल्या सर्वांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे. सुदैवाने आगीत कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

By

Published : May 16, 2019, 10:14 AM IST

Updated : May 16, 2019, 10:56 AM IST

शनिवार पेठेतील इमारतीला आग

पुणे- शनिवार पेठ भागात जोशी संकुल नावाच्या रहिवासी इमारतीला आज सकाळी आग लागली. प्रभात टॉकीजजवळ असलेल्या गल्लीत ही इमारत आहे. हा सर्व दाटीवाटीचा रहिवासी भाग असल्याने आग लागताच एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली, मात्र इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने काही नागरिक इमारतीच्या गच्चीवर अडकले होते. या सर्वांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे. या पाच मजली इमारतीत एकूण २० फ्लॅट आहेत. या घटनेनंतर २३ नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

शनिवार पेठेतील इमारतीला आग

या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. अजूनही इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात धूर आहे. आग कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन दलाकडून करण्यात येत असून सुदैवाने आगीत कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

Last Updated : May 16, 2019, 10:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details