मुलीच्या हत्येच्या घटनेविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडील हे रिक्षा चालक आहे. ते दत्तवाडी येथे राहण्यास असून त्यांचे पत्नीची सतत भांडण होत असत. त्याच दरम्यान आज पहाटेच्या सुमारास त्यांनी सारसबागे जवळील कॅनॉलच्या मुलीला ठिकाणी आणले. त्यावेळी त्याने मुलीला कॅनॉलमध्ये ढकलून दिले. मुलीने पाण्यात पडल्यानंतर वाचवण्यासाठी आरडाओरड केली. यानंतर आरोपीने पाण्यात उडी मारून मुलीला मारून टाकले. मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नात्याला काळीमा फासणारी घटना: या घटनेनंतर आरोपी वडीलांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ही वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना असून स्वतःच्या वडिलांनीच आपल्या मुलीचा खून केला आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या वतीने आरोपीला पकडून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोपीची चौकशी करून त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली.
पती-पत्नीचा वाद शिगेला : मागील दोन तासांपासून पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान मृतदेहाचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप मृतदेह सापडला नाही. विषारी औषध प्राशन केल्याने मयत मुलीच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वारगेट पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपी वडील हे रिक्षाचालक असून पत्नी ही ब्युटीपार्लरचा व्यवसाय करते. या दोघांचेही 5 वर्षांपूर्वी आपापसात भांडण झाले होते आणि हे प्रकरण घटस्फोटापर्यंत आले होते. त्यानंतर दोघेही सहमतीने पुन्हा एकत्र राहू लागले. पण मागच्या महिन्यापासून दोघांमध्ये पुन्हा भांडण होऊ लागले. त्यानंतर पत्नी तिच्या मुलीबरोबर आईच्या घरी राहायला गेली. त्यानंतर तिने पतीबरोबर घटस्फोट घेण्यासाठी वकिलाच्या माध्यमातून नोटीस देखील पाठविली. पण असे असले तरी मुलगी ही कधी आईकडे तर कधी वडिलांकडे राहत होती.
मुलीला मारून कॅनालमध्ये फेकले: मुलीने स्वतः आई-वडिलांकडे जायची इच्छा व्यक्त केली आणि रात्री साडेदहा वाजता आरोपी वडील मुलीला घरी घेऊन गेले. रात्री तीन वाजता वडिलांनी पत्नी पत्नीला कॉल केला होता. पण ते आजारी असल्याने त्यांना काही समजले नाही. त्यांना दुसऱ्या मुलीचे काहीतरी झाले असे समजले आणि ते पॅनिक झाले. घरातले सर्वजण जागे झाले आणि तेव्हा पत्नी आरोपीच्या मोबाईलवर कॉल केला. पण त्यांनी तो उचलला नाही आणि मग काही वेळाने आरोपी वडिलांनी स्वतः हा कॉल करून सांगितले की, मी मुलीला मारून खंडोबा मंदिर येथील मागील बाजूस कॅनॉलमध्ये फेकून दिले. त्यानंतर घरच्यांनी शोधायला सुरुवात केली आणि आरोपीने सांगितले की, मी मुलीला त्या ठिकाणी फेकले आहे आणि मीसुद्धा विष घेतले आहे. तेव्हा त्यांला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीचा मृतदेह पोलिसांकडून शोधण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी यावेळी दिली.
हेही वाचा :Kasba By Poll Election: मला मुस्लिम मतांची गरज नाही, हिंदूंच्या मतांवर विजयी होणार- आनंद दवे