पुणे : संस्थेचे अध्यक्ष कै. भालचंद्र पाठक हे रुग्णालयात असताना त्यांच्या बनावट सह्या करून संस्थेचे (Fake resolutions) बनावट ठराव (usurp Abhinav Art College in Pune) तयार करत धर्मादाय आयुक्त आणि शासनाची फसवणूक (fake signatures) केली होती. या सगळ्या बेकायदेशीर गोष्टीविषयी संस्थेचे सदस्य असलेले सूर्यकांत देसाई यांनी या विषयी स्वारगेट पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी यामध्ये गुन्हा दाखल (case registered against 9 persons) करून पुढील तपास सुरू केला आहे.
Pune Crime : अभिनव कला महाविद्यालय हडप करण्यासाठी बनावट ठराव, खोट्या सह्या घेतल्या म्हणून सचिवासह 9 जणांवर गुन्हा
पुण्यातील प्रसिद्ध अभिनव कला महाविद्यालय हडप (usurp Abhinav Art College in Pune) करण्यासाठी बनावट ठराव (Fake resolutions) घेत खोट्या सह्या (fake signatures) केल्याप्रकरणी महाविद्यालयाच्या सचिवसह ९ विश्वस्तावर पुण्यातील स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल (case registered against 9 persons) करण्यात आला आहे. अभिनव कॉलेजचे सचिव पुष्कराज पाठक याच्यासह आरती पाठक, पद्मा पाठक, क्रांती पाठक, मोहन पाठक, अश्विनी पाठक, जयदीप लडकत, रामचंद्र पीसी, गौरव दिवेकर आणि कांतीलाल ठाणगे या सर्वांनी मिळून संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
घटना निंदनीय असल्याचे मत :अभिनव कला महाविद्यालय हे पुण्यातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था असून त्या संस्थेमार्फत विविध शाखांचे शिक्षण दिले जाते. हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे; परंतु अभिनव कला महाविद्यालयाचे जे अध्यक्ष आहेत ते कैलासवासी भालचंद्र पाठक हे रुग्णालयात असताना ही संस्था आपल्या ताब्यात राहावी यासाठी या सगळ्या विश्वस्त पदाधिकाऱ्याने प्रयत्न केला. त्यातून त्यांनी त्यांच्या बनावट ठराव आणि बनावट सह्या घेतल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलेला आहे. एका प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेत असे प्रकार होत असेल तर हे चिंताजनक आहे. त्यामुळे पुण्यामध्ये शैक्षणिक माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात असे प्रकार झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गुन्हे दाखल :सचिवासह या पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले. त्याचा तपास स्वारगेट पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे. यासंबंधीची तक्रार आहे. ती या संस्थेचे विश्वस्त असलेले श्रीकांत देसाई यांनी दिली होती. त्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.