पुणे - शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे मध्यंतरी एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यावर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत जोरदार टिका देखील केली होती. त्यांच्या या निर्णयाची पक्षश्रेष्ठींनी दखल घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. आम्हीच शिवसेना आहोत असा दावा करुन शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधार बंड पुकारलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदारांनी साथ दिली. त्यामुळे पक्षातच ठाकरेविरूध्द एकनाथ शिंदे (Eknath Shinde against Thackeray) असा गट पडला. त्यानंतर शिवसेनेतील माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, देखील एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. अश्यातच राज्यभर शिवसैनिक आणि शिंदेगट यांच्यामधील संघर्ष पाहायला मिळाला. पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेत जे-जे शिंदे गटात सहभागी झाले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या देखील आत्ता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
maharashtra political crisis : माजी मंत्री विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी
एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या नेत्यांची हकालपट्टी करण्याचं सत्र सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी (Vijay Shivtare Expelled From Party) करण्याचे आदेश शिवसेनेच्या मुखपत्रातून देण्यात आले आहे.
शिवसेनेच्या मुखपत्रातून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पक्षाच्या विरोधात काम केल्यानं आणि पक्षाची शिस्त मोडल्यानंतर विजय शिवतारे यांना शिवसेनेने अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार असून ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करत होते. विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर त्यांच्यावर हकालपट्टी कारवाई करण्यात आली आहे. विजय शिवतारे यांनी आपण शिंदे गटात जात असल्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता.