पुणे: एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना आलेल्या पात्राच्या पार्श्वभूमिवर त्यांची अधिक काळजी घेण्याबाबतच्या सूचना पोलीस विभागला आणि ठाणे पोलिसांना देण्यात आल्या होत्या. सध्या जी चर्चा सुरू आहे ती चर्चा अनावश्यक स्वरूपाची असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार वाडा येथे महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या पत्रानंतर एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिंदे गटाकडून करण्यात येणारे आरोप खोटे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नव्हत्या असेही वळसे पाटलांनी यांनी यावेळी सांगितले आहे.विशेष म्हणजे त्यांनी याबाबत कुठलीही मागणी केली नव्हती त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी पत्र दिले होते.आणि तो पत्र राज्याचे पोलिस विभागाचे प्रमुख यांना पाठविण्यात आले होते.असेही त्यांनी स्पष्ट केले.