महाराष्ट्र

maharashtra

Express Way : ब्रेक फेल झाल्याने विनाचालक ट्रक दुभाजकाला धडकला, अनर्थ टळला

मुंबई-पुणे महामार्गावर ( Mumbai Pune Express Way ) सिंमेट वाहून नेणारा ट्रक सुसाट वेगाने दुभाजकाला धडकत ( Driverless truck hit Divider ) धावत होता. दरम्यान, हा ट्रक कुठल्याच वाहनासोबत न धडकल्यामुळे मोठा अपघात टळला आहे.

By

Published : Dec 9, 2022, 10:40 PM IST

Published : Dec 9, 2022, 10:40 PM IST

Express Way
ब्रेक फेल झाल्याने विना चालक ट्रक दुभाजला धडकला

पुणे: पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर ( Mumbai Pune Express Way ) आज मोठा अनर्थ टळला. विना चालक एक ट्रक सुसाट वेगाने दुभाजकावर धडकत ( Driverless truck hit Divider ) धावत होता. सुदैवाने त्याची धडक इतर वाहनांना लागली नाही. पुण्याहून सिमेंटच्या गोण्या घेऊन हा ट्रक मुंबईला निघाला होता.

ब्रेक फेल झाल्याने विना चालक ट्रक दुभाजला धडकला

ट्रकचा ब्रेक फेल:तेव्हाच अमृतांजन पुलाच्या आधी ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास या ट्रकची आधी बसला धडक बसली. त्यामुळे घाबरलेल्या चालकाने ट्रकखाली उडी घेतली.

मोठा अनर्थ टळला: मात्र त्याच सुसाट वेगाने पुढे गेला अन डिव्हाईडरला धडकत धावत राहिला. अमृतांजन पुलापुढे गेल्यावर ट्रक थांबला अन सर्वांचा जीव भांड्यात पडला. सुदैवाने या घटनेत अनर्थ टळला.

ABOUT THE AUTHOR

...view details