महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रेम प्रकरणातून दुहेरी हत्याकांड, खेड तालुक्यातील घटना

खेड तालुक्यातील करंजविहीरे गावात दुहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम संबंधातून हत्याकांड घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये प्रेम प्रकरणात मदत करणाऱ्याचीही हत्या करण्यात आली आहे. राहूल गावडे, बाळू गावडे असे हत्या झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत.

चाकण पोलीस ठाणे
चाकण पोलीस ठाणे

By

Published : Jul 17, 2021, 6:03 PM IST

पुणे (खेड) - तालुक्यातील करंजविहीरे गावात दुहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम संबंधातून हत्याकांड घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये प्रेम प्रकरणात मदत करणाऱ्याचीही हत्या करण्यात आली आहे. राहूल गावडे, बाळू गावडे असे हत्या झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत. मृत प्रियकर बाळू गावडे हा करंजविहीरे गावातील बाळू मरगज यांच्या वीटभट्टीवर कामाला होता. याच काळात बाळूचे वीटभट्टी मालकाच्या मुलीशी प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर बाळूने या मुलीला पळवून नेले. (मुलीचे वय 21) मुलीला पळवून नेल्यानंतर नातेवाईकांनी या दोघांचा शोध घेतला. त्यानंतर या दोघांना आणि यामध्ये मदत करणाऱ्याला रात्री उशिरा वीटभट्टी मालक बाळू मरगज यांच्या 'माणूसकी' या हॉटेलवर नेऊन जबर मारहाण केली.

खेड तालुक्यातील करंजविहीरे गावात दुहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रजपुत

तापत्या सळईचे दिले चटके

बाळू गावडे याचे लग्न झालेले होते. बाळुने त्या मुलीला पळवून नेले. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांना याचा राग अनावर झाला. यामध्ये बाळुला त्या मुलीला पळवून घेऊन जाण्यासाठी मदत केल्यामुळे राहुल गावडेला लोखंडी रॉड, दांडके याने जबर मारहाण केली. तसेच, तापत्या सळईचे चटके दिले. यामध्ये या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

आई-वडीलांसह भाव आणि इतर 9 जणांवर गुन्हे दाखल

लग्न झालेले असताना दुसऱ्या मुलीशी पळवून गेला म्हणून मृत बाळू गावडे याच्या पत्नीनेही बाळूला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, ज्या मुलीला पळवून नेले तीलाहा चांगलीच मारहाण केली आहे. सध्या ती मुलगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणानंतर चाकण पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मुलीच्या आई-वडीलांसह भाव आणि इतर 9 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, या सर्वांना अटकही करण्यात आली आहे.

गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान

चाकणसारख्या परिसरात दिवसेंदिवस औद्योगिक क्षेत्र वाढत आहे. त्याचबरोबर गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. दरम्यान, यामध्ये अनेक लोकांचे हकनाक बळी जात आहेत. या वाढत्या घटनांमुळे पोलिसांपुढे येत्या काळात गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details