राजगुरुनगर (पुणे) -जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागात कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू असून, नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असे, आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी केले. जिल्ह्यातील खेड येथे आढावासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.
"कामाव्यतिरिक्त बाहेर न पडता नागरिकांनी सतर्क राहावे" हेही वाचा -कोरोनाचा हायव्होल्टेज इफेक्ट, वीजबिल आकारणी पद्धत बदलणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 'जनता कर्फ्यू'चे आव्हान केले होते. या आव्हानाला पुणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत मिळाल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शहर, गाव, वस्ती अशा प्रत्येक ठिकाणी आरोग्य कर्मचारी कोरोनाबाबत मार्गदर्शन करत आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत उपचार करण्यासाठी ठिकठिकाणी केंद्र उभारण्यात आली असल्याची माहिती पानसरे यांनी दिली.
कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित नागरिकांनी आरोग्य केंद्राशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी असंही पानसरे म्हणाल्या आहेत. पुणे, मुंबई व इतर शहरी भागातून नागरिक ग्रामीण भागाकडे येत आहेत. अशा नागरिकांना कुठलाही आजार असेल त्यांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आपली तपासणी करून घ्यावी व वेळीच औषध उपचार घ्यावे व नागरिकांनी कोरोनाबाबत गैरसमज करून घेऊन नये व सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे, आवाहन पानसरे यांनी केले.