जुन्नर (पुणे) - जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यूदर जुन्नर तालुक्यात असल्याने प्रशासन दिवसरात्र मेहनत घेऊन हा दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उभारलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑक्सिजन बेडसाठी असलेल्या व्हेंटिलेटरला, ऑपरेटर नसल्याचे कारण देऊन बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. यासह रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल केले जात असून खाजगी रुग्णालयातून रुग्णांची लुट होत आहे, हा प्रकार जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनी कोविड सेंटरमध्ये जाऊन उघड केला आहे.
बेड उपलब्ध नसल्याचे सांगत रुग्णाला पाठवले खाजगी रुग्णालयात; नारायणगावातील धक्कादायक प्रकार
नारायणगाव येथील कोविड सेंटरमध्ये प्रत्यक्षात 5 बेड शिल्लक असताना, एका शिक्षकाला ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड नसल्याचे सांगत चाकण येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकरणी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारांनी कारवाईचा पवित्रा घेतला आहे.
कोविड सेंटर
हेही वाचा -अजित पवारांनीच केला शरद पवारांचा गेम - निलेश राणे
कोविड सेंटरमध्ये स्थानिक डॉक्टरांनाही सेवा देता यावी यासाठी प्रशासनाकडून खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करण्यात आली. मात्र, याच डॉक्टरांकडून असा गैरप्रकार होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा -केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये एक लाखापेक्षा अधिक जागा रिक्त