महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Doctor Hub : कमला नेहरू रुग्णालयात डॉक्टर हब; मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही

पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाच्या माध्यमातून इतर बाह्य रुग्णालयातील रुग्णांना आता डेली कॉलिंगची सुविधा मिळणार (Kamala Nehru Hospital Daily calling facility ) आहे. मोबाईलवर बोलून व्हिडिओ कॉलिंगद्वारे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्पेशलिस्ट डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार मिळणार( Consult specialist doctor ) आहे.

Doctor Hub
कमला नेहरू रुग्णालय

By

Published : Nov 3, 2022, 3:46 PM IST

पुणे :पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाच्या माध्यमातून इतर बाह्य रुग्णालयातील रुग्णांना आता डेली कॉलिंगची सुविधा मिळणार (Kamala Nehru Hospital Daily calling facility ) आहे. मोबाईलवर बोलून व्हिडिओ कॉलिंगद्वारे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्पेशलिस्ट डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार मिळणार( Consult specialist doctor ) आहे. यासाठी कमला नेहरू रुग्णालयामध्ये डॉक्टर हब तयार केले जात आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर याची चाचणी चालू असून लवकरच हे काम पूर्ण होऊन ही सुविधा रुग्णांना मिळणार आहे.

रुग्णांवर उपचार :महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कमला नेहरू महावीर कमला नेहरू रुग्णालयासोबत 54 महानगरपालिकेचे दवाखाने आहेत. शहरातील रुग्णांना किरकोळ आणि प्राथमिक उपचार या दवाखान्यात दिले जातात. मात्र काही रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याची आणि उपचाराची गरज असते. त्यासाठी त्यांना कमला नेहरू किंवा ससून रुग्णालयामध्ये पाठवले जाते. मधुमेह उच्च रक्तदाब गरोदर महिलांच्या आरोग्याच्या समस्या,लहान मुलांचे आजार यासाठीचा सल्ला डॉक्टर हब माध्यमातून या छोट्या ओपीडीमध्ये सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे रुग्णाची गैरसोय होणार नाही.

कॅमेरे आणि नेटवर्क रुग्णालयाला पुरवले : यासाठी लागणारे कॅमेरे आणि नेटवर्क हे संबंधित सर्वच रुग्णालयाला पुरवण्यात आलेले आहेत. ते सर्व नेटवर्क जे आहेत ते कमला नेहरू रुग्णालयांमध्ये जोडण्यात आलेले आहेत. यासाठी 35 लाख रुपये खर्च झालेला आहे आणि ही सेवा लवकरच सुरू होईल अशी माहिती डॉक्टर वैशाली जाधव यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details