पुणे- संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. अशा स्थितीत काही संघटनांचे लोक पालखी सोहळ्यात घुसून हा क्रम बिघडवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी प्रशासनाने त्यांना पालखी सोहळ्यात घुसखोरी करू देऊ नये, अशी विनंती श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज यांच्यावतीने पुणे पोलिसांना करण्यात आली आहे.
धारकऱ्यांना पालखी सोहळ्यात घुसू देऊ नका, ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुखांचे पोलिसांना पत्र
मागील वर्षी पुण्यामध्ये संभाजी भिडेंनी वारीदरम्यान शस्त्र दाखवत वारीमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यामुळे यावर्षी आषाढी वारीदरम्यान धारकऱ्यांनी वारीमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन ढगे पाटील यांनी केले आहे.

यावेळी ते म्हणाले, वारकरी म्हणून प्रत्येकजण वारीत सहभागी होऊ शकतो. मात्र, शस्त्र किंवा प्रतिकात्मक शस्त्र घेऊन धारकऱ्यांनी वारीमध्ये सहभागी होऊ नये, यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, यासाठी ढगे पाटलांनी पोलिसांनाही एक पत्र लिहले आहे.