महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे-फलटण मार्गावर डेमू रेल्वेचे आज उद्घाटन

पुणे शहरात आसपासच्या अनेक जिल्ह्यांतून लोक कामासाठी येतात. यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. अशा लोकांसाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने फलटण ते पुणे मार्गावर डेमू रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

demu train
डेमू ट्रेन

By

Published : Mar 30, 2021, 10:14 AM IST

पुणे : फलटण ते पुणे मार्गावर डेमू रेल्वे सेवेचे आज (मंगळवार) उद्घाटन होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या विशेष रेल्वे गाडीचे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. दुपारी 3 वाजता हा उद्घाटन सोहळा आहे. त्यानंतर फलटण येथून डेमू रेल्वेची पहिली फेरी पुण्याकडे रवाना होणार आहे. फलटण-पुणे डेमू रेल्वे सेवा बुधवार(31 मार्च)पासून नियमीत सुरू होणार आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या सोयीसाठी ही रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून फलटण स्टेशन येथून ही गाडी रवाना केली जाणार आहे. ही रेल्वे सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी व सासवड रोड स्टेशनवर थांबणार आहे. गाडी क्रमांक 01435 पुणे येथून दररोज 5 वाजून 50 मिनीटांनी सुटेल व 9 वाजून 35 मिनीटांनी फलटणला पोहचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01436 फलटण येथून १८(सायंकाळी सहा) वाजता सुटेल व पुणे येथे 21(रात्री ९) वाजून 35 मिनीटांनी पोहचेल.

हेही वाचा -नांदेडमध्ये शीख भाविकांच्या हल्ला-महल्ला मिरवणुकीदरम्यान पोलिसांवरच हल्ला; चौघे जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details