महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 20, 2020, 10:01 AM IST

ETV Bharat / state

पिस्तूलाचा धाक दाखवून सात लाखांच्या खंडणीची मागणी; बारामती मोरगाव टोल नाक्यावरील प्रकार

खंडणी म्हणून ७ लाख रुपये मागत डोक्याला पिस्तूल लावून चव्हाणांचे अपहरण केले. तसेच त्यांना लाथाबुक्यांनी व लोखंडी सळईने मारहाण करून त्यांच्याजवळील रोख रक्कम १४ हजार रुपये, सॅमसंग जे-८ मोबाईल, पासपोर्ट असा एकूण ३० हजार रुपयांचा माल जबरीने काढून घेतला.

बारामती
बारामती

बारामती (पुणे) -साताऱ्यातील फॅब्रिकेशन व्यावसायिकाच्या डोक्याला पिस्तूल लावत अपहरण करून त्याच्याकडे सात लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी अमित आप्पासो चव्हाण (वय ३०, रा. सातारा शाहूपुरी) यांनी तक्रार दिली आहे. सातार्‍यातील शाहूपुरीमधील मनोज शिंदे, राम बन्सी व अन्य सहा अनोळखी व्यक्तींविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात अपहरणासह मारहाण करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -कोरोना प्रभाव : मध्य रेल्वेने केल्या 23 गाड्या रद्द

अमित चव्हाण हे बुधवारी (दि. १८) बारामती मोरगाव टोल नाक्याजवळून त्यांच्या कारमधून पुणे येथे निघाले होते. त्यावेळी बारामती मोरगाव रस्त्यावरील टोलनाक्याच्या पुढे आरोपी मनोज शिंदे, राम बंन्सी व अन्य अनोळखी आरोपींनी खंडणी म्हणून ७ लाख रुपये मागत डोक्याला पिस्तूल लावून चव्हाणांचे अपहरण केले. तसेच त्यांना लाथाबुक्यांनी व लोखंडी सळईने मारहाण करून त्यांच्याजवळील रोख रक्क्म १४ हजार रुपये, सॅमसंग मोबाईल जे-८, पासपोर्ट असा एकूण ३० हजार रुपयांचा माल जबरीने काढून घेतला. शिवाय शिवीगाळ करत कुटुबीयांनाही जीवे ठार मारण्याची धमकी देत कारचे नुकसान केले आणि त्यानंतर सोडून दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details