पुणे - जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला जीवधान आणि नाणेघाट पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आता या ठिकाणी भर उन्हाळ्यात सुद्धा कापूस पिंजल्याप्रमाणे धुक्याचे दर्शन पाहायला मिळत आहे.
उन्हाळ्यात सुद्धा धुक्यात लपटतोय नाणेघाट, पर्यटकांना येतोय पावसाळी सौंदर्याचा अनुभव
सह्याद्रीच्या रांगात वसलेल्या जीवधान किल्ला आणि नाणेघाटात रात्री आणि सकाळी वेगळ्या प्रकारचे सौंदर्य पाहायला मिळते. या ठिकाणी उन्हाळ्यात सुद्धा रोज सकाळी डोंगर कड्यावर धुके अवतरल्यामुळे स्वर्गासारखा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
सह्याद्रीच्या रांगात वसलेल्या जीवधान किल्ला आणि नाणेघाटात रात्री आणि सकाळी वेगळ्या प्रकारचे सौंदर्य पाहायला मिळते. या ठिकाणी उन्हाळ्यात सुद्धा रोज सकाळी डोंगर कड्यावर धुके अवतरल्यामुळे स्वर्गासारखा सुंदर नजारा पाहायला मिळतो. या ठिकाणचे सौदर्य पाहण्यासाठी पावसाळ्यात नेहमीच पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र, आता उन्हाळ्यात सुद्धा या ठिकाणी पांढऱ्या शुभ्र रजई सारखे धुके पडत आहे. त्यामुळे धुक्यात लपेटलेला जीवधन किल्ला आणि नानाचा अंगठा भर उन्हाळ्यात पावसाळी सौंदर्याचा अनुभव देत आहे.
सध्या सर्वत्र कडाक्याचे उन्ह पडत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात देखील या धुक्याच्या दृश्यामुळे किल्ल्यावर आणि नाणेघाट फिरायला येणाऱ्या पर्यटकाचे मन सौंदर्य भरुन जात आहे. त्यामुळेच पावसाळी हंगामात निसर्गाने भरभरून दिलेल्या या परिसरात आता उन्हाळ्यातही अनेक पर्यटक हा नजारा अनुभवण्यासाठी येथे मुक्कामी येत आहेत. निसर्गाने या परिसराला खुप काही दिल आहे. मात्र येथे भौतिक सुविधांची खूपच कमतरता आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पण असे असले तरी येथील स्थानिक आदिवासी येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांचे घरगुती पद्धतीने अल्प दरात पाहुणचार करत असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात सुद्धा याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देण्यासाठी येत आहेत.