महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील दूषित सांडपाण्यामुळे शेतीचे नुकसान

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांचे विषारी सांडपाणी गिरीम परिसरातील वन विभागाच्या हद्दीत उघड्यावर सोडून दिले जात आहे. यामुळे पाणी दूषित होऊन शेतजमीनींचे नुकसान होत असल्याची तक्रार, १५ डिसेंबर रोजी तालुका वन विभाग व प्रदूषण विभागाकडे शेतकऱ्यांनी केली होती. परंतु अद्याप दोषींवर कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे.

By

Published : Jan 8, 2021, 7:06 PM IST

दूषित सांडपाण्यामुळे शेतीचे नुकसान
दूषित सांडपाण्यामुळे शेतीचे नुकसान

दौंड -कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांचे विषारी सांडपाणी गिरीम परिसरातील वन विभागाच्या हद्दीत उघड्यावर सोडून दिले जात आहे. यामुळे पाणी दूषित होऊन शेतजमीनींचे नुकसान होत असल्याची तक्रार, १५ डिसेंबर रोजी तालुका वन विभाग व प्रदूषण विभागाकडे शेतकऱ्यांनी केली होती. परंतु अद्याप दोषींवर कारवाई न झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

वनविभागाच्या हद्दीत रासायनिक सांडपाणी

दौंड तालुक्यातील गिरीम परिसरातील वन विभागाच्या हद्दीत राष्ट्रीय पक्षी मोर, हरण, ससा, तरस, मुंगूस, घोरपड, चिंकारा, साप, ससाणा, सालींदर असे अनेक प्राणी आढळून येतात. एमक्युअर व सिप्ला-२ च्या मागील बाजूस असलेल्या वन विभागाच्या हद्दीत विषारी रासायनिक सांडपाणी उघड्यावर मोठया प्रमाणात सोडण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील पाणीसाठा दूषीत झाला आहे. तसेच यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे.

रासायनिक पाण्यामुळे पाणीसाठे झालेदूषित

शासन नियमांची पायमल्ली करत कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील एमक्युअर व सिप्ला-२ च्या सायनिक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण करत, वन विभागाच्या हद्दीत विषारी सांडपाणी सोडले आहे. या रायायनिक पण्यामुळे परिसरातील पाणीसाठे प्रदुषीत झाल्याचे पाहायला मिळत आहेत. खासगी विहिरी तसेच कुपनलिका यामधील पाणी देखील प्रदुषीत झाल्याने शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. हे पाणी वनविभागाच्या हद्दीतून खासगी शेतजमिनीमध्ये येत असल्याची तक्रार स्थानिक शेतकरी अविनाश देशवंत यांनी केली आहे.

प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या वनक्षेत्रात सोडण्यात येत असलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे येथील वन्य प्रण्यांचे जीव धोक्यात आले आहेत. रासायनिक कंपन्या सर्रास शासकीय नियम पायदळी तुडवत आहेत. मात्र प्रशासन याविरोधात कारवाई करत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

अधिकारी पाहाणी करणार

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने या अगोदर बाहेर पाणी सोडणाऱ्या कंपन्यांना निर्देश दिले होते. परंतु आता पुन्हा पाणी बाहेर येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नेमक्या कोणत्या कंपन्या हे रासायनिक प्रक्रिया न केलेले सांडपाणी या वनक्षेत्रात सोडत आहेत, याची लवकरच पाहाणी करण्यात येईल, अशी माहिती प्रदूषण विभागाचे उप-प्रादेशिक अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details