महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात सोमवारी कोरोनाबाधित एकही मृत्यू नाही, 63 नव्या रुग्णांची नोंद

शहरातील मुख्य रस्त्यांसह त्यांना जोडणारे रस्ते तसेच पर्यायी रस्तेही आता बंद करण्यात आले आहेत. शहरात आत्तापर्यंत ५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे. तर, मृतांची संख्या ५४ इतकी आहे. यामध्ये ६ रुग्ण दुसऱ्या शहरातून पुण्यात आलेले होते.

COVID 19 latest update in Pune District
पुणे जिल्ह्यात सोमवारी कोरोनाबाधीत एकही मृत्यू नाही, 63 नव्या रुग्णांची नोंद

By

Published : Apr 21, 2020, 8:19 AM IST

पुणे - शहरातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सोमवारी ६३ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, दिलासा देणारी बाब म्हणजे सोमवारी जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७३४ इतकी झाली आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालल्याने प्रशासनाने कडक संचारबंदी केली आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांसह त्यांना जोडणारे रस्ते तसेच पर्यायी रस्तेही आता बंद करण्यात आले आहेत. शहरात आत्तापर्यंत ५३ कोरोनाबाधीत रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे. तर, मृतांची संख्या ५४ इतकी आहे. यामध्ये ६ रुग्ण दुसऱ्या शहरातून पुण्यात आलेले होते.

दरम्यान, सोमवारी (२० एप्रिल) पिंपरी - चिंचवड शहरात एक ही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. आत्तापर्यंत १९ व्यक्तींना कोरोनामुक्त करण्यात आले असून त्यांना घरी पाठवण्यात आल आहे.


पिंपरी चिंचवड मध्ये ५७ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. ३७ जणांवर उपचार सुरू असून एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण ५१ जण बाधित आहेत. ६ जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर, ४४ जणांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details