महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

‘ईटीव्ही भारत इम्पॅक्ट'.. अवास्तव बिलाच्या तपासणीसाठी खेडमध्ये तालुकास्तरीय समितीची स्थापना

खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची अवास्तव बिलाची मागणी करून आर्थिक लूट होत असल्याची बातमी ‘ईटीव्ही भारत’ प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. खासगी रुग्णालयांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी पाच जणांची समिती तयार करण्यात आली.

By

Published : Jul 30, 2020, 8:16 AM IST

corona update
‘ईटीव्ही भारत इम्पॅक्ट'.. अवास्तव बिलांच्या तपासणीसाठी खेडमध्ये तालुकास्तरीय समितीची स्थापना

राजगुरुनगर (पुणे) -खेड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुगणांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसून, खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची अवास्तव बिलाची मागणी करून आर्थिक लूट होत असल्याची बातमी ‘ईटीव्ही भारत’ प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. खासगी रुग्णालयांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी पाच जणांची समिती तयार करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून शासकिय दरपत्रकाप्रमाणे खासगी रुग्णालयाने दर आकारणी करण्याचे निर्देश प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी आदेश काढून दिले आहे.

खेड तालुक्यात 1 हजार 166 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 724 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. बुधवारी तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, मृतांची संख्या 22 वर गेली आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकट काळात खेड तालुक्यातील खासगी व जिल्हा परिषद अंतर्गत सुरू झालेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांकडून अमर्यादित पैशाची मागणी केली जात होती. पैसे न भरल्यास ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले जात नसल्याची बातमी ‘ईटीव्ही भारत’ प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने या गोष्टीची गांभिर्याने दखल घेतली. प्रांतधिकारी सुनील गाढे यांनी पाच जणांची तालुकास्तरीय समिती स्थापन केली आहे. समितीचे पथकप्रमुख तहसीलदार व सदस्य म्हणून तालुका वैद्यकिय आधिकारी चाकण, आळंदी व चांडोली ग्रामीण रुग्नालय अधिक्षक असणार आहेत.

‘ईटीव्ही भारत इम्पॅक्ट'.. अवास्तव बिलांच्या तपासणीसाठी खेडमध्ये तालुकास्तरीय समितीची स्थापना

तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून खासगी व जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या रुग्णालयातील बिलाची तपासणी करणे, शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार बिलांची आकारणी अवास्तव होते किंवा नाही याची खात्री करण्याची मुख्य जबाबदारी तहसीलदार व समितीतील सदस्य करतील, असे प्रांतधिकारी यांच्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात प्रांतधिकारी यांनी खेड तालुक्यात तालुकास्तरीय चौकशी समितीची स्थापना केल्याने अवास्तव बिलाची आकारणी होऊन ऑक्सिजन बेड वेळेवर उपलब्ध होईल असे आपेक्षित आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details