महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Court rejects Rashmi Shukla closure report : बड्या नेत्याच्या फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला

अनेक बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्या प्रकरणी (case of big leaders phone tapping) राज्य गुप्तचर विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला (Former Head of State Intelligence Rashmi Shukla) यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलिसात ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्तांतरण झाल्यानंतर हे प्रकरण बंद करण्यासाठी पोलिसांनी न्यायलयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मात्र पुणे पोलिसांकडून देण्यात आलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून (Court rejects Rashmi Shukla closure report) लावला आहे.

By

Published : Dec 21, 2022, 6:31 PM IST

Court rejects Rashmi Shukla closure report
क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला

पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, आमदार आशिष देशमुख, खासदार संजय काकडे, नाथाभाऊ खडसे यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप (case of big leaders phone tapping) त्यांच्यावर होता. राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना, रश्मी शुक्ला यांनी (Former Head of State Intelligence Rashmi Shukla) राजकीय नेत्याचे फोन टॅपिंग केले होते. राज्यातील बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुणे पोलिसांकडून देण्यात आलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून (Court rejects Rashmi Shukla closure report) लावला आहे. न्यायालयाचा हा निर्णय शिंदे -फडणवीस सरकारला धक्का मानण्यात येत आहे.


फेब्रुवारी महिन्यात फोन टॅपिंग प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसात ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. याचा शहर पोलिस तपास करत होते. परंतु, राज्यात सतातंर झाले आणि शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांचा तपास पोलिसांनी बंद करण्यासाठी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. परंतु, न्यायालयाने तो आज फेटाळून लावला आहे.



आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये कार्यरत आहेत. सत्तातंरानंतर त्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या होत्या. तर, दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रश्मी शुक्ला यांची भेट झाल्याची माहिती मिळाली होती. यामुळे आता अनेक चर्चा रंगल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details