महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजगुरूनगरमध्ये कोरोना रुग्णाची हाताची नस कापून आत्महत्या

शहरात कोरोनाबाधित असलेल्या 60 वर्षीय व्यक्तीने हाताची नस कापून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली आहे. ही आत्महत्या नैराश्यातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ते आणि त्यांची पत्नी खासगी रुग्णालयात 15 दिवस उपचार घेऊन चारच दिवसांपूर्वी घरी आले होते. मात्र, दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. रुग्णालयात अवास्तव खर्च झाल्यावर आणि एक अहवाल निगेटिव्ह आल्यावर ते घरी राहून काळजी घेत होते.

राजगुरुनगर कोरोना रुग्ण आत्महत्या
राजगुरुनगर कोरोना रुग्ण आत्महत्या

By

Published : Aug 8, 2020, 3:06 PM IST

राजगुरुनगर (पुणे) - शहरात कोरोनाबाधित असलेल्या 60 वर्षीय व्यक्तीने हाताची नस कापून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली आहे. ही आत्महत्या नैराश्यातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

खेड तालुक्यात 1 हजार 729 रुग्णांची नोंद झाली असून 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 272 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीचे सावट राजगुरुनगर, चाकण, आळंदी व खेड तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढतच आहे. राजगुरुनगर येथील बाजारपेठ येथे वास्तव्यास असणाऱ्या या 60 वर्षीय पुरुषाला व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. दोघेही पुण्यातील खासगी रुग्णालयात 15 दिवस उपचार घेऊन चारच दिवसांपूर्वी घरी आले होते. मात्र, दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. रुग्णालयात अवास्तव खर्च झाल्यावर आणि एक अहवाल निगेटिव्ह आल्यावर ते घरी राहून काळजी घेत होते.

या व्यक्तीचा काल पुन्हा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज येणार होता. मात्र, त्रास होत असल्याने त्यांनी शुक्रवारी रात्री झोपल्यावर त्याच खोलीत हाताची नस धारदार सुरीने कापून आत्महत्या केली. आज सकाळी मुलगा त्यांना उठवायला गेल्यावर ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. बाजारपेठ परिसरात व शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत राजगुरुनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details