महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 13, 2023, 4:36 PM IST

ETV Bharat / state

Tilak Memorial Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक स्मारक पुरस्कार जाहीर, पुरस्काराबाबत शहर काँग्रेसची नाराजी

पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारकातर्फे दिला जाणारा यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. मात्र, या पुरस्काराबाबत पुणे शहर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

Tilak Memorial Award
Tilak Memorial Award

रोहित टिळक यांची प्रतिक्रिया

पुणे : टिळक स्मारक समितीचा लोकमान्य टिळक पुरस्कार यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मोदींना हा पुरस्कार एक ऑगस्टला प्रदान करण्यात येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला शहर काँग्रेसने विरोध केला आहे. त्यांनी या संदर्भात एक पत्र देखील लिहिले आहे. यावर रोहित टिळक यांनी स्पष्टीकरण देत आपली भूमिका जाहीर केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. मात्र, या पुरस्काराबाबत पुणे शहर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

'यांना' मिळाला पुरस्कार : टिळक स्मारक समितीचा लोकमान्य टिळक पुरस्कार 1983 साली सुरू करण्यात आला होता. हा पुरस्कार या देशाच्या विकासात काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शंकरदयाळ शर्मा, बाळासाहेब देवरस, खान अब्दुल गफार खान, शरदचंद्र पवार, एन.आर. नारायणमूर्ती, जी. माधवन नायर, डॉ. कोटा हरिनारायण, राहुल बजाज, बाबा कल्याणी, ई श्रीधरन, प्रा. एम. एस. स्वामिनाथन, डॉ. वर्गीस कुरियन आदींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

पुरस्कार 1 ऑगस्ट रोजी देणार :हा पुरस्कार कोणत्याही राजकीय व्यासपीठावर दिला जात नाही. देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. आज पुरस्कार जाहीर झाला नाही, त्याची तयारी खूप दिवसांपासून सुरू होती, आता सर्व राजकीय घडामोडी घडल्या आहेत. पण आठ महिन्यांपासून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवारांना आमंत्रित केले आहे, अशी प्रतिक्रिया टिळक यांनी दिली आहे. हा एक बिगर राजकीय सामाजिक पुरस्कार आहे. हा पुरस्कार 1 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया रोहित टिळक दिली आहे.

हेही वाचा -Tilak Smarak Award To Pm Modi: पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल काँग्रेसकडून नाराजी; कार्यक्रम रद्द करण्याची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details