पुणे - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आज मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतला. या बैठकीस पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
पुणे : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मतमोजणी प्रक्रियेचा आढावा
जिल्हाधिकारी राम यांनी मतमोजणी कक्ष, पत्रकार कक्ष, मतमोजणी कर्मचारी प्रशिक्षण, सार्वजनिक संदेश व्यवस्था, वाहनांची पार्किंग, आदी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी राम यांनी मतमोजणी कक्ष, पत्रकार कक्ष, मतमोजणी कर्मचारी प्रशिक्षण, सार्वजनिक संदेश व्यवस्था, वाहनांची पार्किंग, आदी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलात, तर पुणे आणि बारामती मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.