महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune MIDC Fire : उरवडे दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना तत्काळ मदत पोहचविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

पुणे जिल्हा उरवडे येथील कंपनीला आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना लवकरात लवकर आर्थिक सहाय्य उपलब्ध करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दुर्घटनवेळचे छायाचित्र
दुर्घटनवेळचे छायाचित्र

By

Published : Jun 9, 2021, 6:55 PM IST

पुणे- जिल्ह्यातील उरवडे (पिरंगुट) येथील कंपनीला आग लागून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी औद्योगीक सुरक्षा मानकांचा गांभीर्याने आढावा घेण्यात यावा. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना जाहीर करण्यात आलेली शासकीय मदत तत्काळ मिळावी, यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

औद्योगीक सुरक्षा मानकांचा वारंवार आढावा

उरवडेतील दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ शासकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला मिळाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत. या रासायनिक कंपनीतील दुर्घटनेबाबत चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीनेही सर्वंकष चौकशीनंतर तातडीने अहवाल सादर करावा, असे देखील मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्याबाबतही प्रशासनाने कार्यवाही करून, लवकरात लवकर सबंधितांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे. औद्योगीक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांबाबत औद्योगीक सुरक्षा मानकांचा वारंवार आढावा घेण्यात यावा. सुरक्षा उपाययोजनांबाबत, तसेच नियमांबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या उद्योगावर कारवाई करण्यात यावी. सुरक्षा उपाययोजनांतील त्रुटींमुळे जीवितहानी होऊ नये याबाबत कठोरपणे पावले उचलण्यात यावीत, असेही निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

हेही वाचा -Pune MIDC Fire : कंपनी मालक निकुंज शहाला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details