महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात उभारले जाणार चाईल्ड कोविड केअर सेंटर

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा इशारा दिला जात असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून पुणे महापालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेतर्फे शासकीय चाइल्ड कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहे.

Pune child covid care center news
पुण्यात उभारले जाणार चाईल्ड कोविड केअर सेंटर

By

Published : May 8, 2021, 4:01 PM IST

पुणे -कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा इशारा दिला जात असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून पुणे महापालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. या लाटेत 6 वर्षांवरील मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने येरवडा येथील भारतरत्न राजीव गांधी रुग्णालय पूर्ण क्षमतेने वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयात शासकीय चाइल्ड कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहे. एक ते दिड महिन्यात या चाईल्ड कोविड केअर सेंटरचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.

200 ऑक्सिजन बेडचे रुग्णालय होणार तयार -

या ठिकाणी 200 ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण केली जाणार आहे. यात 150 ऑक्सिजन बेड तर उर्वरीत आयसीयू बेड असणार आहेत. तसेच या ठिकाणी 30 बेडची क्षमता असलेले कोविड मॅटर्निटी हॉस्पीटल तसेच 20 बेडचे कोविड डायलेसिस सेंटर उभारले जाणार आहे. या ठिकाणी 18 वर्षांच्या आतील मुलांवर कोरोनाचे उपचार करण्याची सुविधा असणार आहे. त्यानुसार 150 आयसीयू तर 50 आयसीयू बेड असतील. तर आयसीयू बेड मध्ये 1 वर्षाच्या आतील मुलांसाठी 12 एनआयसीयू बेड, तर 2 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी 20 पीआयसीयू बेड आणि तर 10 आयसीसीयू बेड असणार आहे. या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी राजीव गांधी रुग्णालयातील सर्व जागेचा वापर केला जाणार असून त्यासाठी आवश्यक सुविधा उभारणे, मनुष्यबळ नियुक्ती, स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहे. यासाठी एक ते दिड महिन्याचा कालावधी जाणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - येणाऱ्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचेच निवडून येणार - प्रशांत जगताप

ABOUT THE AUTHOR

...view details