महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Corona Third Wave : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पालिका प्रशासन सज्ज - डॉ. आशिष भारती

5 जानेवारीला पुण्यातील कोरोना आकडेवारी चक्क १८०५ वर पोहोचली. काल दिवसभरात शहरात १८०५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व बाबीवर प्रशासन उपाययोजना करत असून तिसऱ्या लाटेसाठी आम्ही सज्ज असल्याची माहिती पालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिली आहे.

Pune corona
Pune corona

By

Published : Jan 6, 2022, 5:48 PM IST

Updated : Jan 6, 2022, 7:05 PM IST

पुणे -पुण्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा आटोक्यात आले होते. मात्र आता पुन्हा रुग्णसंख्या १८०० च्यावर गेली आहे. मागील तीन दिवसांची आकडेवारी पाहता रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. हीच आकडेवारी पुणेकरांची चिंतेत भर घालणारी ठरत आहे. ३ जनेवारी रोजी शहरात कोरोनाचे ४०० च्या आसपास रुग्ण होते. तर ४ जानेवारी रोजी हीच संख्या ११००४ वर पोहोचली आहे. 5 जानेवारीला कोरोना आकडेवारी चक्क १८०५ वर पोहोचली. काल दिवसभरात शहरात १८०५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व बाबीवर प्रशासन उपाययोजना करत असून तिसऱ्या लाटेसाठी आम्ही सज्ज असल्याची माहिती पालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिली आहे.

माहिती देतांना आरोग्य अधिकारी

जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार!

पुण्यातील शिवाजीनगर येथे असलेले जम्बो रुग्णालय सोमवारपासून कार्यान्वित होणार आहे. दुसरी लाट कमी झाल्यानंतर हे रुग्णालय पूर्णतः बंद होते. मात्र रुग्णालय सुस्थितीत असल्याने आता त्याचा पुन्हा वापर करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. जम्बो रग्णालयात विविध प्रकारचे एकूण ८०० बेड आहेत. त्यातील जनरल वॉर्डमधील २०० बेडवरील आरोग्य सुविधा सुरुवातीला कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानंतर गरज पडल्यास इतर प्रकारचे बेड देखील उपलब्ध केले जातील. दरम्यान दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यास पालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती पुणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भरती यांनी दिली आहे.


टेस्टिंगचे प्रमाण वाढले

कोरोना चाचणीसाठी बुधवारी एकूण १३ हजार ४४३ नमुने घेण्यात आले होते. मोठ्या मंगळवारच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. मंगळवारी ६००० रुग्णांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्याचबरबरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग देखील वाढवण्यात आले आहे.

हेही वाचा -Maharashtra Lockdown : राज्यात विकेंड लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार - राजेश टोपे

Last Updated : Jan 6, 2022, 7:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details