पुणे- खेड तालुक्यातील चाकण आंबेठाण चौकाजवळील उड्डाण पुला खाली दोन व्यक्ती चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चाकण पोलिसांनी सापळा रचून दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिली.
चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या दोघांना चाकण पोलिसांनी केली अटक
चाकण आंबेठाण चौकाजवळील उड्डाण पुला खाली दोन व्यक्ती चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चाकण पोलिसांनी सापळा रचून दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिली.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जण चोरीच्या मोटारसायकल विक्रीसाठी चाकणमध्ये येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपुत यांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाला सुचना देण्यात आला त्यानंतर पोलीस पथकाने आंबेठाण चौकाजवळील उड्डाण पूलाच्या ठिकाणी सापळा लावला असता दोन व्यक्ती दोन वेगवेगळया मोटार सायकलींवरून येत असल्याचे निदर्शनास आले, या व्यक्तींवर पोलिसांना संशय आला त्यांची विचारपूस करताच ते पळ काढू लागले असतांनाच त्यांना पोलीस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. भाऊसाहेब गंगाराम दुधवडे वय १९ वर्षे, आणि भाउसाहेब सिताराम दुधवडे (वय १९ वर्षे दोन्ही रा. म्हसोबा झाप, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता आरोपींनी आणखी दोन चोरीच्या मोटार सायकली चोरी केली असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्याकडून एकूण सुमारे एक लाख रूपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१ मंचक इप्पर, सह पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवरे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, विजय जगदाळे, सोमनाथ झेंडे, सुरेश हिंगे, हनुमंत कांबळे, संदिप सोनवणे, जयदिप सोनवणे, नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, विलास कांदे, रेणुका माने यांनी केली.