महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Cat News : उपचारादरम्यान लाडक्या मांजराचा मृत्यू; डॉक्टरांना बेदम मारहाण

पुण्यात एका मांजरीचा उपचारादरम्यान मृत्यू (Pune Cat Death) झाला होता. त्यानंतर तिच्या मालकाला दु:ख होण्यापेक्षा रागच अधिक आला. लाडक्या मांजरीचा उपचारावेळी मृत्यू झाल्यानं चक्क या मालकाने डॉक्टरवर दादागिरी (Doctor Beat Pune) केली. तसेच त्यांनी क्लिनिकमध्येही (Cat Death Owner beat Doctor) जोरदार राडा केला.

By

Published : Dec 15, 2022, 4:19 PM IST

Updated : Dec 15, 2022, 5:25 PM IST

Pune cat news
Pune cat news

क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरांना बेदम मारहाण

पुणे : उपचारासाठी आणलेल्या लाडक्या मांजराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने एका महिलेसह 5 जणांनी क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरला बेदम मारहाण केली आहे. हडपसर परिसरातील डॉग अँड कॅट क्लिनिकमध्ये 10 डिसेंबरच्या रात्री हा प्रकार घडला आहे. डॉ. रामनाथ येण्याबापू ढगे (वय 51) यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून एका महिलेसह 4 अनोळखी इसमाविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोट्याला गंभीर दुखापत:या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपींनी फिर्यादी यांच्या भाजी मंडई जवळील डॉग अँड कॅट क्लिनिकमध्ये उपचारासाठी मांजराला आणले होते. यावेळी उपचार सुरू असताना मांजराचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी 'मांजर कसे झोपले, आता तुला झोपवतो, तुझा दवाखाना बंद करतो, अशी धमकी दिली. फिर्यादी यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत फिर्यादी यांच्या उजव्या पायाच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या क्लिनिकमधील वस्तूंची देखील तोडफोड केली आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

डॉक्टरांनी घेतली पोलिसांत धाव:डॉ. रामनाथ येण्याबापू ढगे हे अनेक वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक प्राण्यांवर योग्य उपचार केले आहेत. त्यांच्याकडे मांजर उपचारासाठी आणलं होतं. त्या मांजरावर योग्य उपचार सुरु होते. मात्र याच उपचारादरम्यान मांजरीचा मृत्यू झाला. याचा मांजर पाळणाऱ्या कुटुंबियांना राग आला आणि त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली. या सगळ्या घटनेनंतर डॉक्टरांनी पोलिसांनी धाव घेतली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Dec 15, 2022, 5:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details