महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Controversial Statement Vijayastambha : करणी सेनेच्या अजयसिंह सिंगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण..

विजयस्तंभाबद्दल वादग्रस्त वक्तव्य ( Controversial Statement Vijayastambha ) केल्याप्रकरणी करणी सेनेच्या अजयसिंह सिंगर यांच्या विरोधात येरवडा पोलिसात गुन्हा दाखल ( Case registered against Ajay Singh Singer ) करण्यात आला आहे. विजयस्तंभ काढून टाका आणि दलित सैनिकांना गद्दार म्हणून संबोधलं होते त्यामुळे सिंगर यांच्याविरोधात विजयस्तंभ अभिवादन दिन समन्वयक राहुल डंबाळे यांनी फिर्याद दिली होती.

Ajay Singh Singer
अजयसिंह सिंगर

By

Published : Dec 30, 2022, 10:20 PM IST

पुणे : दरवर्षी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी भेट देत असतात. 1 जानेवारीला हा कार्यक्रम असतो. हा कार्यक्रम अवघ्या एक दिवसावर आला असताना या कार्यक्रमावर आक्षेप घेणाऱ्या आणि चुकीचे विधान ( Controversial Statement Vijayastambha ) करणाऱ्या करणे सेनेच्या अजय सिंह सेंगर यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case registered against Ajay Singh Singer) करण्यात आला आहे.

विजयस्तंभाबद्दल वादग्रस्त वक्तव्य : करणी सेनेचे अजय सेंगर यांनी एका टीव्ही डिबेट मध्ये आपली भूमिका मांडताना म्हटले होते की, "इंग्रजाकडून लढलेल्या गद्दार भारतीयाचा शौर्य दिन या देशात साजरा कसा काय होतो ? राज्याचे मुख्यमंत्री हे कसे काय सहन करतात ."आम्ही करणे सेनेच्या वतीने एक जानेवारी रोजी इंग्रजाविरोधात इथे जे भारतीय लढले ,त्यांच्यासाठी श्रद्धांजली सहभाग घेणार आहोत", कारण गद्दार भारतीयांना अभिवादन करण्यासाठी चा कार्यक्रम कोरेगाव भीमा येथे होतो या कार्यक्रमावर बंदी टाकावी, अशी मागणी आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रकाश आंबेडकरांवर देखील टीका : प्रकाश आंबेडकर यांनी दंगली व्हाव्यात यासाठी हा कार्यक्रम सुरू केला. देशामध्ये गद्दारांचा सन्मान होता कामा नये. ही आमची स्पष्ट भूमिका आहे .या देशासाठी प्राणाचं बलिदान ज्यांनी दिल आहे. त्यांचा हा एक प्रकारे अपमान आहे .हा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही .कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. हा सरकारने बुलडोझर लावून पाडला पाहिजे. हिंदू आणि बौद्ध हे भाई भाई आहेत. यांच्यातील संबंध बिघडवण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. ही प्रथा चालू केली आहे ती प्रकाश आंबेडकर यांनी आपली राजकीय चूल चालवण्याकरता त्यांनी हिंदू आणि बौद्धांमध्ये दंगली निर्माण व्हाव्यात हा त्यांचा हेतू आहे, असा आरोपही सेंगेर यांनी केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details