महाराष्ट्र

maharashtra

पुणे : लॉकडाऊनमध्ये हॉटेल सुरू ठेवल्याने काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या मुलावर गुन्हा दाखल

कोरोना नियमांचे उल्लंघन करत हॉटेल सुरू ठेवल्याने काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा बाकीर रमेश बागवेसह 24 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरारात्री पुणे पोलिसांनी ही कारवाई केली.

By

Published : May 27, 2021, 7:52 PM IST

Published : May 27, 2021, 7:52 PM IST

case filed against corona rule violators in Pune
पुणे : लॉकडाऊनमध्ये हॉटेल सुरू ठेवल्याने काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या मुलासह 24 जणांवर गुन्हे दाखल

पुणे -कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करत हॉटेल सुरू ठेवल्याने काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा बाकीर रमेश बागवे, मॅनेजर प्रसाद प्रदीप शिंदे, कामगार शाहरुख फारुख शेख यांच्यासह 24 जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा येथील हॉटेलवर पुणे पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री ही कारवाई केली.

शासनाच्या आदेशाचा भंग केल्याने ही कारवाई -

कोंढवा येथील एनआयबीएम रस्त्यावरील एका इमारतीत बाकीर बागवे यांचे 'द व्हिलेज' हॉटेल आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश असतानाही या हॉटेलमध्ये ग्राहकांना बसून जेवनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला. यावेळी हॉटेलमध्ये 24 जण आढळून आले. शासनाच्या आदेशाचा भंग करीत हॉटेल सुरू ठेवल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पकडण्यात आलेल्या सर्व आरोपींना मध्यरात्रीनंतर समजपत्र देऊन सोडण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली.

हेही वाचा - यंदाचा आषाढी पालखी सोहळा पंढरपूरला पायी जाणार; वारकरी आणि महाराज मंडळींची भूमिका

ABOUT THE AUTHOR

...view details