महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 28, 2021, 10:33 PM IST

Updated : Jan 28, 2021, 10:59 PM IST

ETV Bharat / state

पिंपरीत पाच ठेकेदारांवर गुन्हा दाखल; 13 कोटींचा घोटाळा झाल्याची शक्यता

बनावट एफडीआर प्रकरणी पाच ठेकेदारांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल 13 कोटी 87 लाखांचा घोटाळा झाल्याचा संशय पिंपरी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड (पुणे) - येथे बनावट एफडीआर प्रकरणी पाच ठेकेदारांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल 13 कोटी 87 लाखांचा घोटाळा झाल्याचा संशय पिंपरी पोलिसांनी व्यक्त केला आहे. वेगवेगळे पाच पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणी पालिकेचे लेखा अधिकारी रमेशकुमार विठ्ठलराव जोशी यांनी पिंपरी पोलिसांत तक्रार दिली आहे.

या ठेकेदारांवर झाला गुन्हा दाखल

या प्रकरणी डीडी कन्स्ट्रक्शनचे दिनेश मोहनलाल नवानी, वैदेही कन्स्ट्रक्शनचे दयानंद जीवन मळगे, एस.बी. सवई कन्स्ट्रक्शनचे संजय बबन सवई, पाटील अ‌ॅण्ड असोसियटचे सुजित सूर्यकांत पाटील आणि कृती कन्स्ट्रक्शनचे विशाल हनुमंत कुऱ्हाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून पिंपरी पोलीस ठाण्यात काही ठेकेदारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वेगवेगळ्या कामाच्या निविदामध्ये अनामत रक्कम ठेवायची असते. ती काही ठेकेदारांनी बनावट एफडीआर बँकेकडून काढून फसवणूक केली आहे. याची महानगर पालिका आणि पोलीस आयुक्तालायकडून झालेल्या चौकशीनंतर महानगर पालिकेचे लेखा अधिकारी रमेशकुमार विठ्ठलराव जोशी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली गेली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Last Updated : Jan 28, 2021, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details