महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे मतदारसंघात बापटांनी घडवला इतिहास, सर्वाधिक मताधिक्याने विजयी

गिरीश बापट यांना तब्बल 6 लाख 31 हजार 875 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात लढत असलेले काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना 3 लाख 7 हजार 870 मते मिळाली आहेत.

पुणे मतदारसंघात बापटांनी घडवला इतिहास

By

Published : May 24, 2019, 4:51 PM IST

पुणे- लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्य घेत विजय मिळवला आहे. गिरीश बापट यांना तब्बल 6 लाख 31 हजार 875 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात लढत असलेले काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना 3 लाख 7 हजार 870 मते मिळाली आहेत. त्यामुळे बापट यांचे मताधिक्य हे 3 लाख 24 हजारांनी अधिक आहे. हे मताधिक्य पुण्याच्या इतिहासात सर्वाधिक आहे.

या सर्व घडामोडींचा आढावा घेतला आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी ...

या निकालाने पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपलाच कौल दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अगदी सुरुवातीपासूनच काँग्रेस उमेदवारी देण्यापासून संभ्रमात होती. त्यानंतर मोहन जोशी यांनी उमेदवारी दिल्यानंतर त्यांनीही जोरदार प्रचार केला. याला भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी तगडी फाईट देत पुण्यात पुन्हा एकदा कमळ फुलवले.

या सर्व घडामोडींचा आढावा घेतला आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी ...

ABOUT THE AUTHOR

...view details