महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्रावणात भीमाशंकराचे दर्शन नाहीच.. यात्रा रद्द करण्याचा प्रशासनाचा निर्णय

भीमाशंकर परिसरात कोरोनाचा समुह संसर्ग होण्याची भीती आहे. याचीच दखल घेत मंचर येथे देवस्थान, पोलीस व प्रशासनाची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत श्रावण मास यात्रा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे श्रावण महिन्यात भाविकांनी भीमाशंकर परिसरात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

By

Published : Jul 9, 2020, 10:27 AM IST

Updated : Jul 9, 2020, 2:19 PM IST

bhimashankar
श्रावणात भीमाशंकराचे दर्शन नाहीच..

पुणे- शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वीच प्रशासनाने गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धरतीवर आता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी श्रावण महिन्यातही बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर मंदिरातील यात्राही रद्द करण्याचा ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंम्पे यांनी याबाबतची माहिती दिली.

पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना धार्मिक महत्व असलेला श्रावण महिना काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या महिन्यात बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे देशभरातून भाविक येत असतात. त्यामुळे भीमाशंकर परिसरात कोरोनाचा समुह संसर्ग होण्याची भीती आहे. याचीच दखल घेत मंचर येथे देवस्थान, पोलीस व प्रशासनाची एकत्रीत बैठक पार पडली. या बैठकीत श्रावण मास यात्रा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे श्रावण महिन्यात भाविकांनी भीमाशंकर परिसरात येऊ नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंम्पे यांनी केले.

श्रावणात भीमाशंकराचे दर्शन नाहीच..
भीमाशंकर परिसरात पावसाच्या सरी सुरू असुन डोंगदऱ्यांतून खळखळणारे धबधबेही सुरू झाले आहेत. संपुर्ण परिसरात पांढऱ्या शुभ्र धुक्यांची चादर पसरली आहे, असा हा नयनरम्य निसर्ग पाहण्याचा मोह अनेक पर्यटकांना असतो. मात्र यंदा कोरोनाच्या महामारीमुळे भीमाशंकर मंदिर परिसरात पर्यटनावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करुन भीमाशंकर परिसरात प्रवेश करु नये, अन्यथा कारवाई करण्याचे संकेत उपविभागिय पोलीस अधिकारी टोंम्पे यांनी दिले आहेत.
Last Updated : Jul 9, 2020, 2:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details