भीमाशंकरचा हिरवागार परिसर शुभ्र धबधब्यांनी नटला
भीमाशंकर अभयारण्य परिसरातील थंडगार वातावरण, डोंगर कपारीतून वाहणारे धबधबे, पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर पर्यटकांना भुरळ पाडत आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारा भीमाशंकर अभयारण्य परिसर निसर्ग सौंदर्याने नटला आहे
पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारा भीमाशंकर अभयारण्य परिसर निसर्ग सौंदर्याने नटला आहे. डोंगर कपारीतून वाहणारे धबधबे पर्यटकांचे आकर्षण बनत चालले आहेत. सध्या श्रावण महिन्याची यात्राही सुरू झाली आहे. त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांसाठी हे धबधबे पर्वणी ठरत आहेत.