महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा, अजित पवारांचे प्रशासनाला निर्देश

बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हलगर्जीपणा करु नका, सर्वांनी गंभीरपणे घ्या, गर्दी टाळली पाहिजे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

Ajit Pawar on corona
Ajit Pawar on corona

By

Published : Mar 14, 2021, 6:47 PM IST

बारामती -बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हलगर्जीपणा करु नका, सर्वांनी गंभीरपणे घ्या, गर्दी टाळली पाहिजे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात 'कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.

हे ही वाचा - तपास संस्थांच्या चौकशीनंतर योग्य ती कारवाई राज्यशासन करेल - गृहमंत्री अनिल देशमुख

लसीकरणाचा वेग वाढवा -

अजित पवार म्हणाले की, सध्या पुणे जिल्ह्यात तसेच बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. तसेच बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत, यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवावी. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी लोकांची संख्या मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे, याकडे विशेष लक्ष द्यावे. रुग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच तपासणी संख्या वाढवावी. लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा वापर करावा, संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, गृह विलगीकरणाला मान्यता देताना सर्व निकषांची पूर्तता होत असेल तरच परवानगी द्यावी. कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्री याची कमतरता भासणार नाही, याचीही प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असेही पवार म्हणाले.

हे ही वाचा - चोरीच्या संशयातून युवकाचे 'मॉब लिंचिंग'; झारखंडमधील धक्कादायक प्रकार

या बैठकीला पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देखमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details