महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...ज्यांना जायचे ते जातील, फुटीर आमदारांची नावे सांगा - अजित पवार

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेकजण माझ्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. त्यावर आज अजित पवार यांनी ज्यांनी जायचे ते जातील, असे म्हणत त्यांच्या शैलीत सडेतोड उत्तर दिले आहे.

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

By

Published : Jul 13, 2019, 7:17 PM IST

पुणे- गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे अनेकजण संपर्कात असल्याचे म्हटले होते. त्यावर आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

ते म्हणाले, वाटेवर म्हणण्यापेक्षा त्या आमदारांची नावे सांगा कारण उद्या कोणीही काहीही म्हणेल. असे म्हणत जे वाटेवर असतील ते जातील असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते आज पिंपरी-चिंचवड शहरात एका खासगी हॉटेलच्या उदघाटन प्रसंगी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेकजण माझ्या संपर्कात आहेत. त्यातील काही जण युतीत प्रवेशासाठी इच्छुक आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील, असा गौप्यस्फोट गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापुरात केला होता. त्यावर आज अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत सडेतोड उत्तर दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details