महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थ्यांवर हल्ला हे गृहमंत्रालयाचे अपयश; खासदार सुप्रिया सुळे

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सावित्रीबाई फुले विद्यापीठात मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या होत्या.

सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे

By

Published : Dec 18, 2019, 8:43 PM IST

पुणे -राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (कॅब) आणि दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सावित्रीबाई फुले विद्यापीठात मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या होत्या. विविध संघटनांतील शेकडो विद्यार्थी आणि इतर महाविद्यालयांचे विद्यार्थी यात सहभागी होते. सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.

सावित्रीबाई फुले विद्यापीठात मशाल मोर्चा

आंदोलन हा प्रत्येक भारतीयाचा घटनात्मक अधिकार आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा भ्याडपणाचे लक्षण आहे. गृहमंत्री आणि गृहमंत्रालयाचे हे अपयश, असल्याचे सुळे म्हणाल्या.

हेही वाचा - शरद पवारांची खासदार संजय राऊत घेणार 'प्रकट मुलाखत'

एनआरसी आणि कॅब विरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन उभारले होते. या आंदोलनाला मोडून काढण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला आणि अश्रुधुराचा वापर केला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. याचे पडसाद देशभरात उमटले.

ABOUT THE AUTHOR

...view details