महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन

महाविकास आघाडी सरकार परीक्षांबाबत गंभीर नाही, विद्यार्थ्यांनी वर्षभर परीक्षेसाठी मेहनत केली, यासाठी त्यांचा पैसा, वेळ खर्च झाला आणि आता ऐनवेळी सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. परीक्षा जर 21 मार्चला झाली नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानाबाहेर आंदोलन करू, असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर

By

Published : Mar 12, 2021, 4:42 PM IST

पुणे -महाविकास आघाडी सरकार परीक्षांबाबत गंभीर नाही, विद्यार्थ्यांनी वर्षभर परीक्षेसाठी मेहनत केली, यासाठी त्यांचा पैसा, वेळ खर्च झाला आणि आता ऐनवेळी सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचाच विरोध करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर, सरकारने बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढले, मात्र आता 21 मार्चला परीक्षा न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानाबाहेर आंदोलन करू, असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

पडळकर यांच्यासह 20 ते 25 आंदोलकांवर गुन्हे दाखल

तत्पूर्वी एमपीएससीची नियोजित परीक्षा पुढे ढकलल्याने, पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले. यावेळी आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते. आंदोलकांनी तब्बल आठ तास संपूर्ण लाल बहादूर शास्त्री रस्ता रोखून धरला होता. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढले होते. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह वीस ते पंचवीस आंदोलकांवर गुन्हा देखील दाखल केला, त्यांना रात्री अटक करून, शुक्रवारी पहाटे त्यांची सुटका करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details