पुणे - अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे महानगरपालिकेत घडला आहे. विशेष म्हणजे महापौरांच्या दालनात महापौरांच्या समोरच हा प्रकार घडला.
पुण्यात अतिरिक्त आयुक्तांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
शहरातील जलपर्णी हटवण्यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करा, अशी मागणी करत सोमवारी महापौरांच्या दालनातच आंदोलन करत असताना हा प्रकार घडला आहे.
पुण्यात अतिरिक्त आयुक्तांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
निंबाळकर यांनी प्रश्न विचारणाऱ्या नगरसेवकांची लायकी काढल्याने प्रकरण अधिक चिघळले आणि नगरसेवकांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांना मारहाण केली. यावेळी महापौर दालनात मोठा गोंधळ उडाला आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने अतिरिक्त आयुक्तांना दालनाच्या बाहेर नेले. मात्र, महापौरांच्या दालनातच अतिरिक्त आयुक्तांना मारहाण झाल्याने महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली होती.