पुणे - पोलीस असल्याची बतावणी करून नऊ जणांच्या टोळक्याने सेनापती बापट रस्त्यावरून एका तरुण-तरुणीचे अपहरण करुन तरुणाला वाटेतच उतरवून तरुणीला घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सतर्कता दाखवत आरोपींचा पाठलाग करून अपहृत तरुणीची सुखरूप सुटका केली. चतुशृंगी पोलिसांनी ही कारवाई केली.
दत्तात्रय भोईटे, संदीप जाधव, अक्षय दीक्षित, सागर कोळेकर, मंगेश खंडजोडे, शुभम बरकडे, मंगेश शिंदे, राहुल बरकडे आणि किरण बाबर, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ऋत्विक मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा सेल्समन आहे. शनिवारी (दि. 29 ऑगस्ट) सायंकाळी तो व त्याच्या कार्यालयातील एक मैत्रीण सेनापती बापट रस्त्यावर गप्पा मारत थांबले होते. यावेळी त्या ठिकाणी चारचाकीतून काही तरुण आले. त्यांनी आम्ही पोलीस असून तुम्हाला आमच्यासोबत यावे लागेल असे सांगत जबरदस्तीने त्या दोघांनाही गाडीत बसवले. त्यांना बंगळुरू महामार्गाने कात्रज घाटाच्या दिशेने घेऊन गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर तक्रारदार ऋतिक मोहिते याला आरोपींनी मारहाण करत गाडीच्या खाली उतरवले. त्यानंतर तरुणीला घेऊन ते सातार्याच्या दिशेने निघून गेले.
दरम्यान, चतुःशृंगी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपींचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरोपींना सातारा जवळील टोलनाक्याजवळ अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही तासात आरोपींना अटक करणे शक्य झाले. तसेच अपहृत तरुण-तरुणीची सुखरूप सुटका करण्यात आली. आरोपींनी अपहरण नेमके का केले होते. हे अद्याप स्पष्ट झाले नाही. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलीस असल्याचे सांगून तरुण-तरुणीचे अपहरण, पाठलागानंतर 9 आरोपी अटकेत
पोलीस असल्याची बतावणी करुन नऊ जणांच्या टोळक्याने तरुण-तरुणीचे अपहरण केले होते. तरुणाला खाली उतरवून तरुणीला घेऊन ते साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन तरुणीची सुटका केली. यातील 9 अपहरण
चतु:शृंगी पोलीस ठाणे