महाराष्ट्र

maharashtra

VIDEO : दुचाकीसह महिलेने घेतले महादेवाचे दर्शन, व्हिडिओ व्हायरल

By

Published : Mar 4, 2020, 6:03 PM IST

या व्हिडिओमध्ये एक महिला थोडक्यात बचावली आहे. अॅक्टिव्हाचा रेस करताना गाडीने वेगात पुढे जाऊन महादेवाच्या मंदिरात लोटांगण घेतले आहे. सुदैवाने यात महिलेला जखम झाली नाही.

viral video
व्हायरल व्हिडीओ

पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये देवदर्शन कस घ्यावं? असा दाखला देत हा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पसरवण्यात येत आहे. संबंधित व्हिडिओ हा पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुचाकीसह महिलेने घेतले महादेवाचे दर्शन

काय आहे प्रकार -

या व्हिडिओमध्ये एक महिला थोडक्यात बचावली आहे. ऍक्टिव्हाचा रेस करताना गाडीने वेगात पुढे जाऊन महादेवाच्या मंदिरात लोटांगण घेतले आहे. सुदैवाने यात महिलेला जखम झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात महादेव नगर आहे. तिथे काल सकाळी संबंधित महिला गेली होती. त्यानंतर महिलेने दुचाकी सुरू केली आणि अचानक रेस वाढला, त्यामुळे महिला दुचाकीसह मंदिरात नंदीसमोर गेली. महिला जोरात पडली मात्र, सुदैवाने गंभीर जखमी झाली नाही. तातडीने महिलेने दुचाकी उचलली आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न करत केला. तोपर्यंत शेजारील महिला आणि मुले पळत आली होती. हा सर्व प्रकार मंगळवारी घडला असून सध्या याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details