पुणे: पुण्यातील येरवडा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. लहान भावंड घरी भांडत असताना आई रागावल्याने दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काल सायंकाळी रहात्या घरात ही घटना घडली आहे. आत्महत्येची नोंद येरवडा पोलीस ठाण्यात झाली आहे.
Pune Crime: आई रागावल्याने दहावीत शिकणाऱ्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या - a 16 year old girl committed suicide
Pune crime: इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. किरकोळ कारणावरून तिने असे कृत्य केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येची नोंद येरवडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सर्वत्र हळहळ व्यक्त पिडीता ही इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. किरकोळ कारणावरून तिने असे कृत्य केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पिडीत मुलीच्या वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. घटना घडली त्यावेळी ते बाहेर गावी गेले होते. काल ते घरी परतल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
तिने गळफास लावून घेतले: पिडीता आणि तिचा लहान भाऊ, बहीण घरी भांडण करत होते. यावरून सारखेच तुम्ही भांडत असता या कारणामुळे आई रागावली. याचा राग मनात धरून बाथरूममध्ये गेली, बाथरूमचा दरवाजा बंद करून तिने गळफास लावून घेतले. बराच वेळ झाले ती बाथरूममधून बाहेर आली नसल्याने आईने शेजाऱ्याना सांगून बाथरूमचा दरवाजा उघडला असता. तिने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. तिला उपचाराकामी रुग्णालयात नेले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.