पुणे -एकीकडे देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. तरीही दुसरीकडे मात्र अवैध धंदे सुरू असल्याचेही समोर येत आहे. हवेली तालुक्यातील सोरतापवाडी गावात गावठी हातभट्टीचा अड्डा सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी मध्यरात्री काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत २ जेसीबीच्या मदतीने या अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी अवैधरित्या दारू तयार करणाऱ्या ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
लॉकडाऊन दरम्यान अवैधरित्या दारू तयार करणाऱ्या ९ जणांना अटक, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
हवेली तालुक्यातील सोरतापवाडी गावात गावठी हातभट्टीचा अड्डा सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी मध्यरात्री काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत २ जेसीबीच्या मदतीने या अड्ड्यावर धाड टाकली.
लॉकडाऊन दरम्यान अवैधरित्या दारू तयार करणाऱ्या ९ जणांना अटक, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गावठी हातभट्टीवर ही धडक कारवाई करण्यात आली आहे. यावेळी दारू बनवण्यासाठी उभारलेल्या कढया जेसीबीने तोडण्यात आल्या. या कारवाईत तब्बल 42 हजार लिटर हातभट्टीचे रसायन आणि 28 हजार लिटर हातभट्टी दारू नष्ट केली. दारू तयार करण्याच्या कामात वापरले जाणारे दोन पिकअप वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत एकूण 17 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.