महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात कोरोनाचे 9 रुग्ण... नायडू रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी

ज्या नागरिकांना सर्दी-खोकला यासारखे आजार आहेत. त्यांनी आपल्या जवळच्या सरकारी रुग्णालयात तपासणी करणे गरजेचे आहे. त्याठिकाणी तपासणीनंतर जर आवश्यकता वाटली. तर त्यांना पुढील तपासणीसाठी महापालिकेच्या नायडू रुग्णालयात पाठवण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

9-corona-virus-patients-positive-in-pune
नायडू रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी

By

Published : Mar 12, 2020, 8:04 PM IST

पुणे - राज्यात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे. त्यातील पुण्यातील 9 जण आहेत. त्यामुळे प्रशासनाने कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान ज्या नागरिकांना सर्दी-खोकला यासारखे आजार आहेत. त्यांनी आपल्या जवळच्या सरकारी रुग्णालयात तपासणी करणे गरजेचे आहे. त्याठिकाणी तपासणीनंतर जर आवश्यकता वाटली. तर त्यांना पुढील तपासणीसाठी महापालिकेच्या नायडू रुग्णालयात पाठवण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

नायडू रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी

हेही वाचा-नाथाभाऊंसाठी पक्षाने वेगळा प्लॅन आखला असेल - पंकजा मुंडे

दरम्यान, रुग्णालयांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते आहे. विशेषतः परदेशात जाऊन आलेल्या नागरिकांची तपासणी रुग्णालयात होत असल्याने असे नागरिक देखील नायडू रुग्णालयात तपासणीसाठी येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details