महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

75 Years Old Women on Bicycle : 75 वर्षांची तरुण आज्जी; सायकलवर फिरला निम्मा भारत

आपल्या वयाचं कारण देत आपल्या स्वप्नांना मुरड घालणारे अनेक लोक आपण पाहिले असतील. माझं वय झालंय आता हे मी कसं करू? किंवा माझं वय झालंय हे मला आता जमेल का? अशी म्हणायची जणू आपल्याकडे पद्धतच झाली आहे. त्याहीपलीकडे जाऊन काही लोक तर आपल्या वयाला लाजून काहीच न करता घरातच बसतात. पण अनेक ध्येयवेडे लोक या साऱ्याला अपवाद असतात.

75 Years Old Women on Bicycle
निरुपमा भावे

By

Published : Mar 30, 2022, 3:46 PM IST

पुणे - आपल्या वयाचं कारण देत आपल्या स्वप्नांना मुरड घालणारे अनेक लोक आपण पाहिले असतील. माझं वय झालंय आता हे मी कसं करू? किंवा माझं वय झालंय हे मला आता जमेल का? अशी म्हणायची जणू आपल्याकडे पद्धतच झाली आहे. त्याहीपलीकडे जाऊन काही लोक तर आपल्या वयाला लाजून काहीच न करता घरातच बसतात. पण अनेक ध्येयवेडे लोक या साऱ्याला अपवाद असतात. माझं वय किती जरी असेल तरी मी माझ आयुष्य मनसोक्त जगू शकतो किंवा जगू शकते, असे सांगणारे खूप कमी उदाहरण आपण पाहिले असतील. त्यातलाच एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पुण्यातील आज्जी. त्यांनी वयाची 74 वर्षे पूर्ण केली आहेत. तरी त्या आज्जी मनाने मात्र तरुण आहेत. ( 75 Years Old Women on Bicycle ) त्याचं कारण असं या आजीबाईंनी आत्तापर्यंत एकूण 10 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे, तो ही चक्क सायकवरून. होय या आजीने आत्तापर्यंत जवळपास निम्म्या पेक्षा जास्त भारत भ्रमण हे सायकलवरून केले आहे.

निरुपमा भावे याबाबत बोलताना

पुण्यातील 74 वर्षाच्या आजीची ध्येयवेडी कहाणी -पुण्यातील प्रभात रोड येथे राहणाऱ्या निरुपमा भावे या आज वयाच्या पंच्याहत्तरी पर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. पण त्यांचा उत्साह मात्र अगदी 25 वर्षातल्या तरुणांना देखील लाजवणारा आहे. निरुपमा भावे यांनी आत्तापर्यंत संपूर्ण भारतभर जवळपास दहा हजार किलोमीटरचा प्रवास हा सायकलवरून केला आहे. नुकताच या 74वर्षांच्या आजींनी अवघ्या 16 दिवसांत पुणे ते सुंदरबन असा 2100 किलोमीटरचा प्रवास देखील केला आहे.

कसा सुरू झाला आजींचा हा सायकल प्रवास -निरुपमा भावे आणि त्यांचे पती हे दोघेही वाडिया कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. ते दोघेही तिथे नोकरी करत असताना त्यांच्या पतीचे एक मित्र जे त्यावेळी ६० वर्षांचे होते ते रोज सायकल वरून औंध ते वाडिया कॉलेज चा प्रवास हा सायकलने करायचे. म्हणजे ते गृहस्थ वयाच्या साठीत देखील १४ ते १६ किलोमीटरचा प्रवास हा सायकल ने करायचे. हे सारे पाहूनच निरुपमा भावे यांना प्रेरणा मिळाली आणि इथून सुरू झाला त्यांचा सायकलचा प्रवास. कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही धडपडतच होत असते पण आपल्यापैकी बरेच जण या सगळ्या कष्टामुळे ती गोष्ट करणं सोडून देतात पण काही थकल्या नाहीत. हळूहळू प्रयत्न करत त्यांनी ही मजल मारलीच.

हेही वाचा -Rajesh Tope on Mask Free Maharashtra : राज्यात मास्क मुक्तीबाबत तूर्तास निर्णय नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

आत्तापर्यंत एकूण 10 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास -वयाच्या ५४ व्या वर्षी निरुपमा भावे या पहिल्यांदा सायकल वरून फिरायला निघाल्या आणि पहिल्यांदाच त्यांनी या प्रवासात वाघा बॉर्डर ते आग्रा अशी मजल मारली. आणि त्यांचा सुरू झालेला हा प्रवास असाच चालत राहिला. पहिल्या वर्षी वाघा बॉर्डर ते आग्रा असा प्रवास केल्यानंतर, त्यांनी दुसऱ्या वर्षी भुवनेश्वर ते कलकत्ता, तिसऱ्या वर्षी गोवा ते कोचिन त्यानंतर चेन्नई ते कन्याकुमारी. पण त्यांचा हा प्रवास इथेच थांबला नाही नंतर निरुपमा भावे यांनी मध्यप्रदेश, राजस्थान, सौराष्ट्र , मनाली, लेह या ठिकाणी देखील प्रवास केला एवढेच नाही तर आजींनी आणखीन एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे खार्दुंगला त्या जवळपास अठरा हजार 380 फुटांवर देखील त्या सायकलीनेच गेल्या.

त्याचबरोबर निरुपमा भावे यांनी आपला ७० वा वाढदिवस पुणे ते कन्याकुमारी हा प्रवास अवघ्या 16 दिवसांत पार करत आपला वाढदिवस साजरा केला. त्यानंतर आपला 72 वा वाढदिवस पुणे ते जम्मू काश्मीर अशी सायकल चालवत साजरा केला. त्याचबरोबर आत्ता त्यांनी पुणे ते कलकत्ता असा एकवीसशे किलोमीटरचा प्रवास करत १० हजार किलोमीटरचा सायकल प्रवासाचा एक टप्पा पार केला आहे. एवढेच नाही तर या आधी आपल्या दररोजच्या कामाला देखील सायकल वरूनच जातात. आणि आजच्या तरुणाईला संदेश देताना आज्जी सांगत आहेत की तुम्ही तुमच्या स्कूटरला दोन दिवस सुट्टी देऊन सायकलवरून प्रवास करा आणि या जीवनाचा आनंद घ्या.

ABOUT THE AUTHOR

...view details