महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंगेश दोशी यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने आयोजित रक्तदान शिबीरात ७५ बाटल्या रक्तसंकलन

मंगेश दोशी यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात ७५ बाटल्या रक्तसंकलन झाले.

पुणे
पुणे

By

Published : Apr 12, 2021, 4:54 PM IST

दौंड (पुणे) -तालुक्यातील पाटस येथिल श्री नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने मंगेश दोशी यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. याची जाणीव ठेवून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे ७५ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. नागेश्वर मित्र मंडळाच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

गेली चार वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन -

दौंड तालुक्यातील पाटस येथील नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने मंगेश दोशी यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. याची जाणीव ठेवून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे ७५ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. नागेश्वर मित्र मंडळाच्या सामाजिक बंधीलकीचे सर्व स्तरांतून कौतूक करण्यात येत आहे.

रक्तदानाची गरज -

सध्या कोरोना काळ असून अनेक लोक कोरोना बाधित होत आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे सरकारच्या वतीने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक तरुणांनी रक्तदान करावे या रक्ताचा उपयोग अनेक लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी होईल. यासाठी नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने तरुणांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले . या रक्तदान शिबिरात सुमारे ७५ बाटल्या रक्तसंकलन झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शिवाजी ढमाले यांनी दिली.

उपस्थित मान्यवर -

यावेळी पाटस गावच्या सरपंच अवंतीका शितोळे, ग्रामपंचायत सदस्या तृप्ती भंडलकर, सत्वशील शितोळे, दिलीप हंडाळ, नितीन दोरगे, नितीन शितोळे, नागेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजी ढमाले, राहुल आव्हाड, झाकीरभाई तांबोळी, गणेश रंधवे, दीपक आव्हाड, संतोष शितकल, पोपट गायकवाड, सागर शितोळे विनोद भोसले, मिलिंद दोशी, समाधान शिंदे, संपत भागवत, राजू शिंदे, छगन म्हस्के यांसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details