महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Coronavirus : पुणे विभागात 5 हजार 635 रुग्ण कोरोनामुक्त

पुणे जिल्हयातील 7 हजार 947 बाधीत रुग्ण असून कोरोनाबाधित 4 हजार 729 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 861 आहे. कोरोनाबाधित एकूण 357 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

By

Published : Jun 2, 2020, 7:07 PM IST

Pune Corona News
पुणे कोरोना बातमी

पुणे - विभागातील 5 हजार 635 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले यााआहेत. विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजार 247 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 135 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 477 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 223 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 7 हजार 947 बाधीत रुग्ण असून कोरोनाबाधित 4 हजार 729 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 861 आहे. कोरोनाबाधित एकूण 357 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 205 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. 1 जूनच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 286 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 174, सातारा जिल्ह्यात 53, सोलापूर जिल्ह्यात 43, कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील 573 कोरोनाबाधित रुग्ण असून 200 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 351 आहे. कोरोनाबाधित एकूण 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयातील 992 कोरोनाबाधित रुग्ण असून 446 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 458 आहे. कोरोना बाधित एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 112 रुग्ण असून 65 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 43 आहे. कोरोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 623 कोरोनाबाधित रुग्ण असून 195 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 422 आहे. कोरोना बाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यत विभागामध्ये एकुण 91 हजार 282 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 86 हजार 230 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 52 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 75 हजार 851 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 10 हजार 247 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details