महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Cng News : पुणे जिल्ह्यात 42 सीएनजी पंप आजपासून राहणार बेमुदत बंद, काय आहे नेमके कारण?

आजपासून अनिश्चित काळासाठी टॉरेंट सीएनजीची खरेदी आणि विक्री होणार नाही. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 42 सीएनजी पंप आजपासून संप करणार असल्याचे या सीएनजी डीलर्स असोसिएशन पदाधिकारी ध्रुव रूपारेन यांनी सांगितलेले आहे. मार्जिनबद्दलचा डिफरन्स टॉरेंट गॅस कंपनी देत नाही, त्यामुळे हे आंदोलन करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Pune CNG Pump
टोरंट सीएनजी

By

Published : Jan 27, 2023, 9:46 AM IST

Updated : Jan 27, 2023, 10:45 AM IST

प्रतिक्रिया देताना टोरंट सीएनजी डीलर्स असोसिएशन पदाधिकारी

पुणे:हे आंदोलन सीएनजीच्या सुधारित ट्रेड मार्जिनबद्दल एमओपीएनजीने जारी केलेल्या परिपत्रकाच्या संदर्भात आहे. एका बाजूला पुणे जिल्ह्यात एमएनजीएलनी आणि प्रमुख सीजीडीने थकबाकीसह पैसे दिलेत किंवा ते देण्यास सहमती दर्शवली आहे, तिथेच दुसर्‍या बाजूला टॉरेंट गॅससह पैसे देण्याबाबत काही कंपन्या वाद उभे करत आहेत. 2021 मध्ये परिपत्रक जारी झाल्यानंतरही, सीएनजी डीलर्सना फेअर ट्रेड मार्जिन जारी करण्याबाबत अनेक प्रयत्न करुनही आजपर्यंत त्याचा परिणाम झाला नाही.

सीएनजी वितरकांचे 8 कोटींचे नुकसान:अस्तित्वात असलेल्या एमओपीएनजी परिपत्रक क्र. एम-12029(11)/5/2021-ओएमसी-पीएनजी डीटी.01.11.2021 आज सुद्धा बंधनकारक आहे. मेसर्स टॉरेंट गॅसचे एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ परिपत्रकानुसार पैसे न देण्याचे वर्तन अनुचित आहे. ज्यामुळे पुणे जिल्ह्यातील सीएनजी वितरकांचे आजपर्यंत जवळपास 8 कोटींचे नुकसान झाले आहे.

कोणताही स्थगिती आदेश नाही: जिल्हा प्रशासनाच्या तसेच राज्य सरकारच्या देखील निदर्शनास आणून देण्यात आले होते की, कोणत्याही संबंधित प्राधिकरणाकडून कोणताही स्थगिती आदेश प्राप्त झालेला नाही. टॉरेंट गॅसला आजपर्यंत मार्जिन न भरण्याबाबत कोणताही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. त्याचे कोणतेही दस्तऐवज नाहीत किंवा तपशिलांसह असे रेकॉर्डवर आले नाही. ओएमसीसह संबंधित सर्व प्राधिकरणांसह अनेक वेळा यासंदर्भात सुमारे डझनभर बैठका झाल्या आहेत. असे असतानाही, परिपत्रकानुसार डीलर्सना त्यांच्या योग्य मागणीला न्याय मिळू शकलेला नाही.

दिशाभूल करणाऱ्या उपायांचा अवलंब: जिल्ह्याची दिशाभूल करणाऱ्या अशा उपायांचा अवलंब केला जात आहे. एका नामांकित सीजीडी कंपनीने आपल्या चॅनल भागीदारांप्रती केलेले खोटे वर्तन सर्वसामान्यांच्या आणि राज्य प्रशासन देखील निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊनही डीलर्स अजूनही निस्वार्थ सेवा देत आहेत. वेळोवेळी दिलेली खोटी आश्वासने दिली जातात. त्यांचे पालन केले जात नाही म्हणून आश्वासने घेऊन त्यांचा संप मागे घेण्यास डीलर्स तयार नाहीत.

अनिश्चित काळासाठी खरेदी आणि विक्री बंद:सध्याच्या मार्जिनवर व्यवसाय पूर्णपणे अव्यवहार्य असल्याने, याद्वारे पुणे जिल्ह्यातील टॉरेंट गॅसच्या डीलर्सनी 27 जानेवारी 2023 पासून टॉरेंट सीएनजीची अनिश्चित काळासाठी खरेदी आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण डीलर्स सध्याच्या ट्रेड मार्जिनवर सीएनजी विकण्यात येणार नाही. यापुढे एमओपीएनजीच्या परिपत्रकानुसार मार्जिन सुधारित होईपर्यंत डीलर्सनी पुढील तोट्यावर सीएनजी चालवण्यास आणि विक्री करण्यास नकार दिला आहे. डीलर्सना लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी राज्य यंत्रणेने या समस्येचे निराकरण करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा: Mumbai Crime: बेपत्ता आरोग्य सेविकेचा शोध घेण्यासाठी आज पोलीस ठाण्यासमोर निदर्शने

Last Updated : Jan 27, 2023, 10:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details